सध्याच्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील महत्वाचे शहर म्हणून चाकण शहर ओळखले जाते. चाकण शहर पुणे-नाशिक महामार्ग क्रमांक ५० वर पुण्याचे उत्तरेस ४० कि.मी. अंतरावर वसलेले आहे. तसेच चाकण या ठिकाणीच मुंबई-अहमदनगर हा राज्य महामार्ग या राष्ट्रीय महामार्गास छेदतो. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने चाकणला महत्व प्राप्त झाले आहे. चाकणचे भौगोलिक स्थान १८ अंश ७५ अंश उत्तर रेखांश ७५ अंश ८५ अंश पूर्व रेखांश असे आहे.
चाकणचे भौगोलिक स्थान १८ अंश ७५ अंश रेखांश व ७५ अंश ८५ अंश पूर्व रेखांश असे आहे. चाकणची समुद्रसपाटीपासूनची उंची ६४६ मीटर (२११९) फुट आहे.
प्रत्येक गाव ऐतिहासिक दुष्ट्या महत्त्वाचे आहे. या गावातील ऐतिहासिक वस्तूंनी भूतकाळात त्या त्या युगाचे प्रतिनिधीत्व केलेले असते. महत्व या वास्तू ऐतिहासिक दृष्ट्या महत्वपूर्ण आहे. आपणास आपल्या देशाचा राष्ट्रीय इतिहास ज्ञात असतो. आपल्या जिल्हाचा इतिहास माहित असतो. मात्र आपलाच गावचा, अगदी आपल्या कुटुंबाचा, आपल्या उपनामाचा (आडनाव) इतिहास ज्ञात नसतो. जर आपण आपल्या कुटुंबाचा व गावचा इतिहास शोधून त्याची मांडणी केली तर आपल्या देशाच्या राष्ट्रीय इतिहासात आपोआपच भर पडेल.
चाकणच्या प्राचीन इतिहासाविषयी काही दंतकथा व ऐकीव कथा या परिसरात आजही ऐकवयास मिळतात त्या पुढीलप्रमाणे.............
पांडव कालीन एक चक्रीनगर म्हणजे आजचे चाकण होय. पांडवापैकी भीमाने बकासुराचा वध केला. ती जागा चाकणजवळ आहे.
प्राचीन काळातील शांडिल्य ऋषीचा आश्रम चाकण या गावी होता.
रामायणातील एका युद्ध प्रसंगी दशरथ राज्याच्या रथाची कानखीळ ज्या गावी गळून पडली ते गाव कन्हेरसर या नावाने ओळखले जाते. हे गाव चाकणच्या पूर्वेस आहे. रथाच्या9 चाकाची कानखीळ पडल्यानंतर रथाचे चाक ज्या ठिकाणी गळून पडले ते चक्रेश्वर म्हणजेच आजचे चाकण होय.
वरील आख्यायीकांशी साधर्म्य असणारी नद्यांची नावे, गावांची नांवे, आजही चाकण परीसारात पहावयास मिळतात.
महाराष्ट्राचे आध्य सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातवाहन राजवटीत पुणे/चाकण/जुन्नर या प्रदेशाची वर्णने आलेली आहेत. सातवाहन काळात जुन्नर-भीमाशंकर-चाकण-देहू या परिसरात भौद्ध भिक्खूनी निवासासाठी अनेक लेण्या कोरल्या आहेत. भंडारा डोंगरावरील लेणी चाकणच्या जवळ पश्चिमेस आहे. या लेण्यांमध्ये (गुहेत) बसून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी अभंग रचना केली आहे.
महाराष्ट्रात बौद्ध भिक्षूंनी उत्तरेतून येताना तत्त्कालीन शेतीसाठी प्रगत असणारा नांगर आपल्या बरोबर आणला. या नंगारास लोखंडी फाळ असल्यामुळे शेतीची मशागत चांगली होवू लागली. त्यामुळे शेतीचे उत्त्पन्न वाढले व या नंगारास प्रथम वापर महाराष्ट्रात जुन्नर-चाकण-देहू या परिसरात करण्यात आला.
सातवाहनानंतर शिलाहर राजवट महाराष्ट्रात प्रभावशाली बनली. या राजवटीत प्रशासकीय दृष्टीने अनेक विभागीय देश निर्माण करण्यात आले. त्यामध्ये सर्वात मोठा विभागीय देश म्हणून मौरींज देश व पुणक देश होते. त्यापैकी पूणक देशामध्ये चाकणचा समावेश होता. ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये चाकणचा उल्लेख चाकण चौ-र्येंशी असा करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वारांच्या आईचे वडील सिद्धेश्वरपंत कुलकर्णी यांच्याकडे चाकण व परिसरातील चोवीस गावांचे कुलकर्णी पद होते. संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी चाकण पासून जवळच आळंदी येथे आहे. आळंदी या तीर्थ क्षेत्राचे महत्व जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहे. आळंदीहून दरवर्षी आषाढ महिन्यात निघणारा पालखी सोहळा व वारकरी दिंडी सोहळा पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. या आळंदीच्या पंचक्रोशीचा उल्लेख संत नामदेवांनी केलेला आहे. त्यामध्ये चाकणचा उल्लेख आला आहे.
मराठ्यांचा आध्य इतिहासकार ग्राड डफने देखील चाकणचा किल्ला कोणी बांधला याविषयी चर्चा केली आहे. बुशदीद हबशी नावाच्या माणसाने अल्लौउधीन खिलजी दक्षिणेत येण्यापूर्वी सुमारे शंभर वर्षे आधी हा किल्ला बांधला आहे. त्याचप्रमाणे चक्रेश्वर मंदीर, झीत्राई मंदीर, तुळजाभवानी मंदीर, खंडोबा देवस्थान, सोमेश्वर देवस्थान, इत्यादी प्राचीन वास्तू चाकणच्या स्थानिक इतिहासाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.
बहामनी राजवटीत चाकण गावचा उल्लेख स्पष्टपणे पहावयास मिळतो. बहामनी राजाचा मुख्य प्रधान मुहम्मद गावन देखील काही काळ चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार होता. याच्या काळात चाकण मध्ये मोठा शस्त्रांचा तळ होता. इसवी सन १४८६ मध्ये चाकणचा किल्ला व सभोवतालच्या प्रदेशावर देखरेखीसाठी मोहम्मद गावाने आली-तालीश-दिही या अधिकाऱ्यास नेमले होते. पुढे मलिक अहमदच्या हातून तो अधिकारी मारला गेला.
इसवी सन १५९५ मध्ये अहमदनगरचा बहादुरशहा याने संग्राम दुर्ग किल्ला व चाकणचा परिसर मालीजीराजे भोसले यांना दिला. इ.स. १६४७ मध्ये शिवाजी महाराजांनी संग्रामदुर्गवर ताबा मिळविला. इ.स. १६६० मध्ये स्वराज्यावर मोठे संकट आले. याच वर्षात शाहिस्तेखानाने चाकणच्या किल्ल्याला वेढा दिलेला होता. दिनांक २७ जून १६०९ मध्ये मलिक अंबरने चाकण गावातील काही जमीन मुरारीभट बिन गंगाधर भट ब्रह्मे यांस इनाम दिली होती. याशिवाय छत्रपती संभाजी महाराज/छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीतील चाकण परिसरातील मोघल-मराठा संघर्ष चाकण जवळ खेड या ठिकाणी झालेली महाराणी ताराबाई व छत्रपती शाहू यांच्यातील इ.स. १७०८ ची लढाई या लढाईत छत्रपती शाहूंना विजय मिळाला. ब्रिटीशांच्या आगमनानंतर त्यांनी आपले साम्राज्य सांभाळण्यासाठी व दळणवळणात गतिमानता यावी या उद्धेशाने पुणे व मुंबई या शहरांना जोडणारे रस्ते बांधले. अहमदनगर-मुंबई व पुणे-नाशिक रस्ते एकमेकांना छेदतात त्याच ठिकाणी चाकण वसलेले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक पार्श्वभूमिमुळे चाकणच्या इतिहासाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे.
आधुनिक काळात पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील व अहमदनगर-मुंबई या मुख्य राज्य महामार्गावरील महत्वाचे ठिकाण म्हणुन चाकणला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रगत औद्योगिक वसाहत (एम.आय.डी.सी.) व या औद्योगिक वसाहतीत जागतिकीकरणामुळे आलेल्या अनेक जागतिक कंपन्या, यामुळे चाकण अंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून उदयास आले आहे. याशिवाय विशेष आर्थिक क्षेत्र (एस ई झेड) व प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे चाकणच्या स्थानिक इतिहासाला विशेष महत्व प्राप्त होत आहे.
चाकणच्या किल्ल्याचा पाया कसा घातला व किल्ला कसा बांधला या विषयीची माहिती शिवकालीन-पत्र-सार-संग्रहाच्या तिसऱ्या खंडाच्या लेखांक क्रमांक २३४२ मध्ये सविस्तर आलेली आहे ती पुढीलप्रमाणे ......................
सं.१५१७ विक्रम २३४२
ष. १८३२ अश्विन षु . ५
इ. १४६० सप्टेंबर १९.
चाकणेस दुर्गाचा पाया उभारिला. ज्व्हारीसी फर्मात्ती केली. दर गावासी गाडा येक व वेठे दोन, येकु वेटा दुर्गच्या पायात वालीत येकु गाडयासांगते सोडीत, याबद्दल विलायती गयाल झाली. पद्मावती, गिरमटेक, गीरमालवड पाटील मोकदम गिरमा कान पाटील, पुणे देश अपुली मोकदमाई, परुसी माजुमियाच्या हवाली मोकादमी केली. गिरम्याची हसीचा वोवासीचा कोणी उभा राहील. थालपत्र दावील त्यास आरधी मोकादमी देईन राजन मियाचे ह्श्सीच वोसीचा अर्धी खाईल.”
वाकली-पत्र-सार-संग्रह या लेखंकावरून प्रस्तुत किल्ल्याचा पाया हा १९ सप्टेंबर १४६० रोजी घातला. ग्रड डफच्या मते अल्लाउद्दीन खिलजीच्या अगोदर १०० वर्षे म्हणजेच इ.स. १२९३-९४ मध्ये बुशादिद हबशी दक्षिणेत आला. या दोन्ही तारखामध्ये मोठी तफावत आहे. या ठिकाणी डफच्या नोंदीपेक्षा शिवकालीन-पत्र-सार-संग्रहातील लेखांक विशासाहर्ता असल्याने आपण तो ग्राह्य मानण्यास हरकत नाही अथवा ग्राह्य धरणे योग्य होईत. किल्ल्याचा तट बांधताना कधी कधी तटाच्या आत बाहेरच्या तटाला समांतर असा तट घातलेला आढळतो. अशा वेळी बाहेरच्या तटाला शतल्या तटाच्या दृष्टीने चिलखत असे म्हणतात. अशाच प्रकारचे चिलखत बुरुजालाही घातलेले असते. आतमाधीत तटाला पडकोट म्हणतात. तटाच्या दरवाज्यातून प्रवेश करताच दरवाज्या समोर आतल्या बाजूस भिंत घालतात. मनुष्य आत जाताच त्यास डाव्या व उजव्या बाजूने वळावे लागते. त्यामुळे आतल्या भिंतीवर असलेला पहारेकरी त्या शत्रुपक्षाच्या अथव अनोळखी मनुष्यावर बंदुकीची गोळी/दगडांचा मारा करून त्याचा बंदोबस्त करू शकतात. या जागेस रनमंडळ असे म्हणतात. संग्राम दुर्गची बांधणी करताना अशाच रनमंडळाची बांधणी केली आहे.
वास्तविक स्वराज्य स्थापन व विस्ताराच्या वेळी शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यातून संग्राम दुर्ग जिंकून घेतला. यावेळी किल्ल्याचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हा होता. शिवाजी महाराजांनी संग्राम दुर्गची किल्लेदार फिरंगोजीकडे कायम ठेवुन, त्यास मराठी राज्याच्या सेवेस घेतले. त्यावेलीपासून तो शिवाजी महाराजांचा स्वामीभक्त नोकर बनला.
चाकणची लढाई :-
१६५९ च्या जुलै महिन्यामध्ये औरंगजेब मुघल बादशहा झाला. थोड्याच दिवसात त्याने आपला दक्षिणेकडील विशेषतः मराठ्यांविषयीच्या धोरणांमध्ये बदल केला. दक्षिणेच्या सुभ्यावर शहजादा मुअज्ज्मऐवजी शाहिस्तेखानाची नेमणूक केली. यापाठीमागचा त्याचा उद्धेश होता की, दक्षिणेत शिवाजीने वरचढ होवू नये. त्याचप्रमाणे अफझल खानाच्या वधानंतर अली आदिलशहा याने आपले सैन्य शिवाजीवर पाढवून त्यांना कोंडीत पकडले. विजापुरकरांना मदत करून दोघांचा जो समान शत्रू त्याचा नाश करावा हे शाहिस्तेखानच्या स्वारीमागचे कारण होते.
शाहिस्तेखान हा औरंगजेबाचा मामा होता. शूर सेनापती व अनुभवी शासक होता. मराठ्यांवर स्वारीचे त्यास आदेश मिळताच तो मोठ्या सैन्यासह औरंगबादहून १६६० च्या जानेवारी महिन्यामध्ये निघाला. औरंगबाद-अहमदनगर-सुपे-बारामती-शिरवळ-सासवड मार्गे दिनक ९ मे १६६० रोजी पुण्यात पोहोचला. शाहिस्तेखानाने पुण्यात आल्यवर लाल महालात म्हणजेच शिवाजींच्या राहत्या वाड्यातच तळ दिला. पुणे व आसपासच्या प्रदेशात खानाच्या सैनिकांनी वाटेल तसा धुमाकूळ घातला. चाकणचा प्रदेश उजाड केला. शाहिस्तेखानाने स्वत:च्या पराक्रामाचे दर्शन घडविण्यासाठी चाकणचा संग्राम दुर्ग किल्ला जिंकून घेण्याचे ठरविले. यावेळी संग्राम दुर्गचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हा होता. दादोजी कोंडदेव यांनी फिरंगोजी नरसाळा यांची संग्राम दुर्गवर किल्लेदारपदी नियुक्ती केली होती. शाहिस्तेखानाने चाकणवर स्वारी केली त्यावेळी संग्रामदुर्ग जिंकण्यासाठी शाहिस्तेखानाने पुढीलप्रमाणे सैनीकांची व्युव्हरचना केली.
उत्तरेस – स्वत: शाहिस्तेखान.
शिपाई – गिरीधर, कुवर, वीरमदेव, सिवदियर, (सिसेदियह) ह्शाबखन, त्रिंबकजी भोसले, दावजी भोसले व इतर बादशाही सैन्य.
पूर्वेस – प्रवेशद्वारावर शामसुद्धीनखान, तोफखान्याचा दरोगा मीर अब्दुल मज्बुद, सय्यीद हसन, उझबकखान, खुदावंत हबशी, दक्षिणेत नेमलेल्या त्याच्या फौजेसह राणा राज सिंगाचा नोकर, विजयविंग, सुलतान अली अरब व अलायर बुखारी इ. सरदार.
दक्षिणेस – भावसिंग, सर्फराझखान, जादुराय, जौहारखान, हबशी इ.
पश्चिमेस – राजा रायसिंग व सेवदियहचे सेंन्य.
संग्रामदुर्गच्या पूर्वेस तटावर व प्रवेशद्वारावर चार व मध्ये एक भक्कम बुरुज होते. किल्ल्याभोवती ३० फुट खोल व १५ फुट रुंद खंदक होता. खंदकाच्या बाहेर परकोट होता. प्रत्येक बुरुंजावर तोफा होत्या. मराठ्यांनी किल्ल्यामधून मुघल सैनिंकावर तोफांचा मारा केला. मराठ्यांच्या प्रतिकारामुळे शाहिस्तेखानास किल्ला जिंकता येईना. अखेरीस मुघल सैनिकांनी आपल्या छावणीपासून किल्ल्याच्या तटापर्यंत भुयार खोदले. तटास सुरुंग लावून तटास भगदाड पाडले. त्यामधून सैन्य आत घुसले. या प्रसंगामुळे मराठ्यांचे २६८ सैनिक झखमी झाले.
संग्रामदुर्गचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हा होता. छत्रपती शिवाजीमहाराजांनी किल्ला जोपर्यंत लढविणे शक्य आहे. तोपर्यंत किल्ला लढविन्यास सांगितले होते. नाईलाज झाला तरच किल्ला मुघलांना देण्यास सुचविले होते. यावेळी शिवाजीमहाराज शिद्दी जौहरच्या पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले असल्याने चाकणला मदत मिळणे शक्य नव्हते. नेताजी पाल्कारांवर मदतीची जबाबदारी सोपविली होती. मात्र, त्यास पूर्ण करता आली नाही. अगदी निरुपाय अवस्थेत मराठ्यांनी शाहिस्तेखानाकडे संग्रामदुर्ग सोपविला. अशा प्रकारे चाकणचा किल्ला व परिसरावर मुघलांचे वर्चस्व प्रस्तापित झाले. शाहिस्तेखानाने संग्रामदुर्गसारखा लहानसा किल्ला जिंकून घेण्यासाठी ७३,००० घोडेस्वार सैनिकांची फौज वापरली होती. शाहिस्तेखानाचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण मराठ्यांनी इ.स. १६६९-७० मध्ये चाकणचा किल्ला व परिसर पुन्हा मुघलांकडून जिंकला. त्यावेळी चाकणची वतनदारी कारभार निलोपान्ताकडे सोपविला.
चाकण जिंकल्यानंतर शाहिस्तेखानाने मिळवलेल्य विजयाची नोंद करणारा फारशी भाषेतील शिलालेख संग्रामदुर्गच्या किल्ल्यामध्ये कोरविला आहे. शाहिस्तेखानाने संग्रामदुर्ग जिंकल्यावर बांधकामे केली. इतरही डागडुजी केली. कारभार इ किल्लेदारी उझबेगखानानाकडे दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यात लाल महालात शाहिस्तेखानाचा चांगलाच समाचार घेतला. शाहिस्तेखान पराभूत होवून उत्तरेकडे गेला. ओरंगजेबाने इ.स.१६६३ मध्ये शहजादा मुअज्जमची दक्षिणेच्या सुभेदारपदी नेमणूक केली. मुअज्जमने जुन्नर व चाकण येथे लष्करी तळ उभारले. चाकण शहर मुघलांनी जिंकल्याने ओरंगजेबास आनंद झाला. ओरंगजेबाने चाकण शहराचे नाव बदलून इस्लामाबाद असे ठेवले. चाकणच्या पराभवानंतर शिवाजी महाराजांनी फिरंगोजी नरसाळा यांस भूपाळगड किल्ल्याची किल्लेदारी दिली.
इ.स. १६७१ मध्ये दक्खनचा मुघली सुभेदार दिलद्ख्खनचा मुघली सुभेदार दिलेरखानाने पुन्हा चाकणवर स्वारी केली. १६७१ च्या डिसेंबर महिन्यात त्याने चाकण जिंकले हि हकीगत शिवाजीमहाराजांना रायगडावर असताना समजली. दिनांक १३ जानेवारी १६७२ रोजी महाराज महाडला आले. दिलेरखानाचा पराभव करण्यासाठी विविध किल्ल्यांवरील सैन्य एकत्र करून चाकण मधील दिलेरखानाच्या तालावर मराठ्यांनी हल्ला केला. चाकण काबीज केले. महत्वाच्या अनेक कैद्यांना संग्रामदुर्गवरून रायगडावर पाठविले. त्यामधील आजारी व जखमी कैद्यांची त्यांनी सन्मानपूर्वक सेवा करविली. ज्या मुघल सैनिकांनी व कैद्यांनी महाराजांकडे नोकरी करण्याची इच्छा प्रदर्शित केली, त्यांना आपल्याकडे नौकरी दिली. बाकीच्या कैद्यांना सोडून देण्यात आले. दिलेरखानाचा हा पराभव म्हणजे ओरंगजेबाचा पराभव होता. कारण दिलेरखान मुघलांचा दक्षिणेतील सुभेदार होता.
दिलेरखानाच्या पराभवानंतर संग्रामदुर्ग किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर महराजांनी मराठ्यांना चैथाई व सरदेश्मुखीच्या सनदा दिल्या. २ जून १७२४ च्या एका पत्रामधील उल्लेख संग्रामदुर्गच्या मालकी हक्काविषयीचा आहे. त्यामधील उल्लेखानुसार संग्रामदुर्गचा किल्लेदार मखदूम आलम हा होता. तो मोघल सरदार असून किल्ला आपणाकडे देत नाही असा आशय आबाजी पुरंदरे यांनी पहिल्या बाजीरावास कळविला होता. यानंतर संग्रामदुर्गचे सर्व किल्लेदार मरठी सरदार दिसून येतात.
१७३५ च्या डिसेंबर महिन्यापासून संग्रामदुर्गाचा कारभार मल्हार पुरंदरे यांचेकडे सोपविला. पहिल्या बाजीरावाच्या निधनानंतर नानासाहेब उर्फ बाळाजी बाजीराव पेशवे पदी आला. त्यास पेशवे दरबारातील विविध सरदारांचा विरोध होता. दमाजी गायकवाड त्यापैकी एक. १७४१ च्या प्रारंभी दामाजीने संगमनेरकडून पुण्याकडे जाताना संग्रामदुर्गचा किल्लेदार भास्कर गोपाळ व मराठी सैन्यास त्रास दिला. संग्राम दुर्गची झालेली हानी भरून काढल्याची नोंद नानासाहेब पेश्वांच्या रोजनिशीमध्ये आली आहे.
माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत संग्रामदुर्गचा कारभार कृष्णराव बापुजी पारसनीस यांचेकडे होता. माधवरावची आर्थिक शिस्त कडक असल्याने, त्यांने प्रशासनामध्ये फेरबदल करून आपल्या विश्वासातील माणसे महत्वाच्या पदावर नेमली. संग्रामदुर्गच्या किल्लेदारपदी कृष्णराव बापुची नियुक्ती हा त्याचाच एक भाग होय.
माधवरावाच्या कारकीर्दीच्या प्रारंभी राघोबादादा व माधवराव यांच्यात कलह उत्पन्न निर्माण झाला होता. राघोबाने मराठ्यांचा सरदार निजाम यास माधवरावास विरोध करून एका अर्थाने मदतच केली. निजाम पुणे परिसरावर चालून आला असता त्याने संग्राम दुर्गावर हल्ला केला. निजामाकडे उत्कृष्ट तोफखाना असल्यामुळे त्याने किल्लावर तोफांचा मारा केला. मात्र त्यास संग्रामदुर्ग जिंकता आला नाही.
पूर्वी नानासाहेब पेश्वांच्या कालखंडामध्ये त्याने अंग्रेचे आरमार बुडविले. तुळाजीस काही काळ संग्रामदुर्गच्या कैद खाण्यात टाकले. एवढेच नव्हेतर तुळाजीस काही काळ संग्रामदुर्गच्या कैद खान्यात ठेवले होते. त्यावेळी तुळाजीस बाबाजी हंडेकर याने सहानभूतीपूर्वक मदत केली म्हणून हंडेकरासही कैदेत टाकले. त्यावेळी संग्रामदुर्गचा किल्लेदार नारायणराव कृष्ण हा होता. संग्राम दुर्गच्या कैदेत असताना तुळाजी अंग्रेस जीवनावश्यक वस्तूंची सर्व तोपरी मदत करावी मात्र पक्क्या बंदोबस्ताने ठेवावे. असा आदेश माधवरावाणे दिलेला दिसतो.
चाकणचा किल्ला भुईकोट असला तरी संरक्षक दृष्ट्या तो मजबूत होता. राज्यातील विविध भागालीत कैद्द्यांना चाकणच्या संग्रामदुर्गच्या बंदिवासात आणून ठेवत. माधवरावाने कर्नाटकात हैदरअलीशी जो संघर्ष केला. त्यामध्ये हैदर आलीचा सरदार सरदारखान मराठ्यांच्या ताब्यात सापडला. त्यास चाकणच्या किल्ल्यात ठेवण्यात आले होते. त्यावेळी चाकणचा कारभार नारायणराव कृष्ण यांचेकडे होता.संग्रामदुर्गचा कैदखाना प्रसिद्ध होता. १७७७ मध्ये दौलत बाबुराव यास कैदेत ठेवले. 1778 मध्ये तुळाजी पवाराचा भाऊ बाहीरजी पवार यास कैदेत टाकले. हे दोघेही निजामास फितूर होते.
मराठ्यांच्या इतिहासातील तोतया प्रकरणामध्ये सामील असलेला कानेर विश्वनाथ चोपडेकर यास २५ ऑगस्ट १७७६ रोजी संग्रामदुर्ग मध्ये अंधारकोठडीतच कैदेत ठेवले.
पेशवे दरबारातील रमणा या कार्यक्रमास राज्याच्या विविध भागातून ब्राम्हणांना बोलविले जाई. त्यांच्या बंधोबास्तासाठी विविध किल्ल्यावरून सैनिक बोलावत. १७७८ मध्ये संग्रामदुर्गचा किल्लेदार नारायणराव कृष्ण याने आपल्या किल्ल्यातून सैनिक पाठविले होते.
चाकणच्या किल्लामध्ये ठेवण्यात आलेल्या कैद्दांचा आणि त्यांना ठोठावण्यात आलेल्या शिक्षांचा तपशील संशोधनासाठी निवडलेल्या कागदपत्रांमध्ये आला आहे. त्यानुसार २७ सप्टेंबर १७८२ रोजी तुळाजी आंग्रे यास संग्रामदुर्गच्या किल्ल्यात कैद्देत ठेवण्यात आले होते.
तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये पेशव्यांचा पराभव झाला. दुसऱ्या बाजीरावाने शरणागती पत्करली. बाजीरावाच्या शरनागतीनंतर मराठी मुलखाची व्यवस्था माउंट स्तुअर्ट एल्फिन्स्टन कडे गेली. २७ जुलै १८१८ मध्ये तो चाकणला आला. चाकणमध्ये त्याने इंग्रज सैनिकांची ठाणी वसविली. मात्र इंग्रजी ठाण्यांनी चाकणमधील गावांना त्रास देवू नये याविषयी काळजी घ्यावी. या विषयीची जबाबदारी पूर्णपणे रॉंबिंन्सकडे सोपविली. अशा प्रकारे चाकणचा संग्रामदुर्ग इंग्रजांनी जिंकून घेतला व त्यावर इंग्रजी अंमल सुरु झाला.
संदर्भ ग्रंथ :- “चाकणचा इतिहास”
लेखक :- डॉ. विलास सोमा गोर्डे