किल्ले सुधारणा व संवर्धन

किल्ले सुधारणा व संवर्धनाची सुरुवात “किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या स्थापनेपशून झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण कि त्या अगोदर किल्ले सुधारणा व संवर्धनाच्या दृष्टीने किरकोळ प्रयत्न सोडता झाले नसल्याचे दिसून येते. परिणामी किल्ल्यातील जागेचा उपयोग कचरा टाकणे, बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावणे या व अशा वाईट गोष्टीसाठीच केला जात असे. किल्ल्याच्या बरोबर मध्य भागातून वाहतुकीसाठी काढलेला रस्ता किल्ल्याच्या उपयोगाचा ठरला नाही. परंतु फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठाण संस्थेच्या स्थापनेनंतर या परिस्थितीत बदल होवू लागला. या संस्थेचा उद्देशच मुली किल्ले संग्रामदुर्ग मध्ये सुधारणा व संवर्धन असा असल्याने व संथ केवळ कागदोपत्री कार्यरत न राहता पूर्णपणे झोकून देवून धडाडीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर अनेक उपक्रम प्रत्यक्ष राबवून किल्ल्याला उर्जित अवस्था आणण्यासाठी प्रयत्न केले गेले.

 

संस्थेची स्थापना व उद्देश :-

“किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान” या नावाने सार्वजनिक विश्वस्थ संस्था म्हणून १८/०२/२००३ रोजी रीतसर स्थापना करण्यात आली. (महाराष्ट्र/१६८/२००३/पुणे) संस्थेच्या अनेक उद्धीष्टांपैकी एक महत्वाचे उद्धीष्ट म्हणजे चाकण येथील संग्राम दुर्ग किल्लाचे सुधारणा व संवर्धन या दृष्टीने जनजागृती कारणे व लोक सहभागातून व शासनाच्या मदतीने व  परवानगीने प्रयत्न कारने हे उधिष्ट डोळ्यासमोर ठेवुन किल्याच्या संदर्भात संस्थेने आजपर्यंत प्रयत्न केले.

 

साफसफाई :- लोकसहभाग, शाळा, महाविध्यालय व इतर संस्थेतील लोकांच्या सहकार्याने वेळोवेळी किल्ल्यामध्ये स्वच्छता मोहीम राबवून किल्ल्याची साफसफाई करण्यात येते. तसेच प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छ झालेल्या भागामध्ये विविध प्रकारची लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यात आली आहे. त्यामाध्यमातून रोज सकाळी व संध्याकाळी पालक आपल्या मुलांसोबत किल्ल्यामध्ये येतात व लहान मुले किल्ल्यामध्ये बसविलेल्या खेलण्यांबरोबर विविध खेळ खेळतात. त्यामुळे किल्ल्यामध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. किल्ल्यामध्ये येणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे, लोकांच्या वावरामुळे आपोपापच किल्ल्यामध्ये स्वच्छता टिकुन राहण्यास मदत होत आहे. तसेच प्रतिष्ठानच्या माध्यमातून पडझड झालेल्या ओट्याची दुरुस्तीकरून त्याचा सार्वजनिक कार्यक्रमासाठी व्यासपीठ म्हणून वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्त्कालीन्न उपमुख्यमंत्री व पर्यटनमंत्री श्री. विजयसिंह मोहितेपातील यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठानच्या नामफलकाच्या अनावनाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी मंत्री महोदयांना किल्ल्याची सध्यस्थिती व संवर्धनासाठी संस्था करू इच्छित असलेले पर्यन्त याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पुरातत्व विभागाने संग्राम दुर्ग किल्ल्याची जतन, जपणूक व संवर्धनाची जबाबदारी प्रतिष्ठानकडे सुपूर्त करण्यात आली. जतन, जपणूक व संवर्धन या प्रयान्तांचा एक भाग म्हणून किल्ल्यातील भग्न अशा दामोदर मंदिराच्या जागी नवीन मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराच्या निमित्ताने चाकणमधील नागरिक किल्ल्यात एकत्रीत येतील व त्याचा उपयोग किल्ले संवर्धनासाठी करून घेता येईल हा त्याच्या मागचा उद्धेश आहे. आजपर्यंत ह्या अनुषंगाने किल्ल्याची उदक शांती करून घेतली. होम हवन केले व यामुळे किल्ल्याबद्दल लोकांच्या मनात असलेली भीती व गूढ कमी होवून किल्ल्यात लोकांचा वावर वाढण्यास मदत झाली. त्यामुळेच आज मितीला किल्ल्यातील दरवर्षी १ जानेवारीस जे कार्यक्रम होतात, त्याला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहिल्यावर याची साक्ष पटते.

 

किल्ल्याची दुरुस्ती :-

आवाहन :- दुर्ग व किल्ले यांच्या सद्दस्थितीबाबत केवळ हळहळ व्यक्त करण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करून आपला ऐतिहासिक वारसा जपण्याचे व संवर्धन करण्याचे काम किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान करीत आहे. चाकण हे ऐतिहासिक गाव असून त्यात संग्रामदुर्ग सारखा किल्ला असताना चाकण महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या नकाशावर नसावे या सारखी दुसरी खेदाची बाब नाही. चाकणचा किल्ला योग्य पद्धतीने दुरुस्त करून ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित केल्यास चाकण पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांना आकर्षित करू शकेल यादृष्टीने संस्था करीत असलेल्या प्रयत्नात आपणही आपल्या इच्छेनुसार व कुवतीनुसार तन, मुन, धनाने मदत करू शकतात. त्यासाठी संपर्काचा पत्ता व मोबाईल नंबर ............

 

किल्ले जतन व संवर्धन कार्याची वृत्तपत्रे व समाजमाध्यमे यांनी घेतलेली दखल....