किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान

किल्ले सुधारणा व संवर्धनाची सुरुवात “किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या स्थापनेपशून झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण कि त्या अगोदर किल्ले सुधारणा व संवर्धनाच्या दृष्टीने किरकोळ प्रयत्न सोडता झाले नसल्याचे दिसून येते. परिणामी किल्ल्यातील जागेचा उपयोग कचरा टाकणे, बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावणे या व अशा वाईट गोष्टीसाठीच केला जात असे. किल्ल्याच्या बरोबर मध्य भागातून वाहतुकीसाठी काढलेला रस्ता किल्ल्याच्या उपयोगाचा ठरला नाही. परंतु फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठाण संस्थेच्या स्थापनेनंतर या परिस्थितीत बदल होवू लागला. या संस्थेचा उद्देशच मुली किल्ले संग्रामदुर्ग मध्ये सुधारणा व संवर्धन असा असल्याने व संथ केवळ कागदोपत्री कार्यरत न राहता पूर्णपणे झोकून देवून धडाडीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर अनेक उपक्रम प्रत्यक्ष राबवून किल्ल्याला उर्जित अवस्था आणण्यासाठी प्रयत्न केले गेले.

 

संस्थेची स्थापना व उद्देश :-

“किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान” या नावाने सार्वजनिक विश्वस्थ संस्था म्हणून १८/०२/२००३ रोजी रीतसर स्थापना करण्यात आली. (महाराष्ट्र/१६८/२००३/पुणे) संस्थेच्या अनेक उद्धीष्टांपैकी एक महत्वाचे उद्धीष्ट म्हणजे चाकण येथील संग्राम दुर्ग किल्लाचे सुधारणा व संवर्धन या दृष्टीने जनजागृती कारणे व लोक सहभागातून व शासनाच्या मदतीने व  परवानगीने प्रयत्न कारने हे उधिष्ट डोळ्यासमोर ठेवुन किल्याच्या संदर्भात संस्थेने आजपर्यंत प्रयत्न केले.


प्रतिष्ठानचे संचालक मंडळ

श्री किरण दशरथ झिंजुरके (अध्यक्ष)

श्री राहुल चंद्रकांत वाडेकर (उप-अध्यक्ष)

श्री अनंत अशोकराव देशमुख (सचिव)

श्री ऋषिकेश सदाशिव बुचुडे (सदस्य)

श्री रविंद्र निवृत्ती शिंदे (सदस्य)

श्री शैलेश सीताराम कड (सदस्य)

श्री योगेश अनंता साखरे (सदस्य)

श्री जयेंद्र विजयकुमार नवगिरे (सदस्य)

श्री विद्यावत्सल क्रांतीकिरण अन्नाप्रगाडा (सदस्य)

श्री किशोर भाऊसाहेब घुमटकर (सदस्य)

श्री दीपक महादेव करपे (सदस्य)